Pune City News
पुणेपुणे शहर

ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या ‘चुका, खुलासे अन किस्से पत्रकारीते’ चे या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

पुणे शहर :- ज्येष्ठ पत्रकार श्याम (तात्या) दौंडकर यांच्या ‘चुका, खुलासे अन किस्से पत्रकारीते’ चे या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी  पुणे जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी सभागृहात झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की :- ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांचे ‘चुका, खुलासे अन किस्से पत्रकारीते’ चे हे पुस्तक म्हणजे जनतेला, राजकीय नेत्यांना, राजकीय सामाजिक जीवन शिकविणारा दस्तऐवजच आहे. गेल्या 30 ते 35 वर्षाच्या पत्रकारीता करीत असताना आलेले अनुभव ‘चुका, खुलासे अन किस्से पत्रकारीते’चे या पुस्तकातून त्यांनी व्यक्त केले आहेत. यावेळी जि.प.च्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जि.प.चे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व पत्रकार उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार श्यामतात्या दौंडकर
ज्येष्ठ पत्रकार श्यामतात्या दौंडकर यांच्या ‘चुका, खुलासे अन किस्से पत्रकारीते’ चे या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी सभागृहात झाले. यावेळी जि.प.च्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जि.प.चे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व पत्रकार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या चार महिन्यातच संपली. यावरुन या पुस्तकाचे महत्व अधोरेखीत होते. जिल्हयाच्या, राज्याच्या राजकारणातील गंमतीदार किस्से या पुस्तकात त्यांनी नमूद केलेले आहेत. पत्रकारांबद्दलचे अनेक गैरसमज या पुस्तकातून दूर होतील. पुस्तक हे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. त्यामुळे सामान्य लोकांना लगेच समजते. गेल्या 30 ते 35 वर्षात श्यामतात्यांना राजकीय सामाजिक जीवनात जे-जे लोक भेटले, मित्र, परिवार त्यांचेही योगदान या पुस्तकात आहे.

एका सामान्य ग्रामीण शेतकरी कुटूंबातून आलेला तरुण सामान्य जनता, वाचक यांच्या समस्या प्रश्न घेवून पत्रकारितेते आपलं स्थान निर्माण करतो. अशा श्याम दौंडकर यांच्या या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीलाही माझ्या मनापासून शुभेच्छा! वाचकांनी पहिल्या आवृत्तीप्रमाणेच दुसऱ्या आवृत्तीलाही प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

 

Related posts

राज्यातील मद्यालयांना रात्री दहापर्यंत परवानगी

Vishal Khandagale

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ!

Vishal Khandagale

मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale