Pune City News
गुन्हे विषयकपुणेपुणे शहर

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार !

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार ! (Rape) केल्याची घटना पुणे शहरांत समोर आली आहे. हा प्रकार 2016 ते जानेवारी 2022 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) तरुणावर बलात्कार (Rape In Pune) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत (Atrocity Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुण्यात राहणाऱ्या 27 वर्षाच्या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन मालेगाव (Malegaon) येथील 27 वर्षाच्या युवराज शालीकराव सुर्यवंशी Yuvraj Shalikrao Suryavanshi (वय-27 रा. मुंगसे, मालेगाव जि. नाशिक) याचावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

महिला सहायक पोलीस निरीक्षक संगिता पाटील (API Sangita Patil) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख मोबाईलवर झाली. यानंतर आरोपीने पीडितेसोबत मैत्री करुन तीला वारजे ब्रिज (Warje Bridge) येथे भेटण्यास बोलावले.
पीडित मुलीला खडकवासला (Khadakwasla) येथे नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर लग्नास नकार देऊन पीडितेची फसवणूक केली. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक संगिता पाटील करीत आहेत.

Related posts

‘शिवसेनेला फसवले ही चूक झाली’ – मुनगंटीवार

Vishal Khandagale

अतिसंवेदनशील भागाची मनपा व पोलिस प्रशासनाच्या वतीने पाहणी

Vishal Khandagale

पंजाब: 167 कोरोना संशयित बेपत्ता

Vishal Khandagale