Pune City News
कसबाकोथरूडखडकवासलागुन्हे विषयकपर्वतीपुणेपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहर १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, चार गुन्हे निरीक्षकांची वरिष्ठ निरीक्षकपदी पदोन्नती

पुणे शहर पोलीस दलात मोठे प्रशासनिक फेरबदल करण्यात आले असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. यामध्ये विशेषतः चार गुन्हे निरीक्षकांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे, तर चार वरिष्ठ निरीक्षकांची बदली वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या अवघ्या महिन्याभरातच पुन्हा केल्या गेल्याने या बदल्यांकडे लक्ष वेधले जात आहे.

 

बदल्यांचा तपशील पुढीलप्रमाणे:                                      🔸 वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती –१) संतोष पांढरे (गुन्हे शाखा) – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग २) विठ्ठल पवार (गुन्हे, उत्तमनगर) – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर ३) यशवंत निकम (सायबर) – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट ४) उत्तम भजनावळे (गुन्हे, सिंहगड रोड) – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतु: श्रृंगी  ५) विक्रमसिंग कदम (गुन्हे, कोथरुड) – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी

🔸 वाहतूक शाखेत बदली –१ ) दिलीप फुलपगारे (वपोनि, खडकी) – पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा २) विजयमाला पवार (वपोनि, विश्रामबाग) – पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा ३) राहुल गौड (वपोनि, सहकारनगर) – पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा ४) युवराज नांद्रे (वपोनि, स्वारगेट) – पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

🔸 गुन्हे शाखेत नियुक्ती – १) उल्हास कदम (वपोनि, चतु:श्रृंगी) – पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रस्ता २) जितेंद्र कदम (गुन्हे, भारती विद्यापीठ) – पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रामबाग ३) दत्ताराम बागवे (गुन्हे, खडकी) – पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी

या बदल्यांमुळे शहरातील पोलिसिंगच्या कार्यपद्धतीत काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून, गुन्हे अन्वेषण आणि वाहतूक व्यवस्थापनात अधिक गतिशीलता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस दलाच्या अंतर्गत हालचालींवर नागरिक आणि गुन्हेगारी विरोधी यंत्रणा दोघांचेही लक्ष लागले आहे.

 

Related posts

२१०० कर्मचाऱ्यांना पगारच नाही

Vishal Khandagale

मधुराणी गोखले आणि विवेक सांगळे यांनी ‘बिग बेस्ट कॅरेक्टर’ ची ट्रॉफी जिंकली

Vishal Khandagale

कोरोना; राज्यातील सर्व निवडणुकांना स्थगिती

Vishal Khandagale