Pune City News
गुन्हे विषयकपुणे शहरवडगावशेरी

खराडी मध्ये युवकाची चाकूने हत्या, दोघे गंभीर जखमी

पुणे – खराडी येथील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्कमधील गार्डनमध्ये शनिवारी सायंकाळी सुमारे पावणेसातच्या सुमारास भीषण घटना घडली. दोन युवकांवर चाकूने सपासप वार करण्यात आले, यात एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दुसऱ्या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत झालेल्या युवकाचे नाव सोनू ऊर्फ लखन सकट वाघमारे (वय १८, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, वादावादीतून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे व त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करत अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. जखमी युवकावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

Related posts

शहरात 3033 रुग्णांची कोरोनावर मात

Vishal Khandagale

रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी ‘काळा दिवस’ – रेस्टॉरंट असोसिएशन

Vishal Khandagale

नौदलाचा अधिकारी असल्याचे भासवून लाखोंचा गंडा घळणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

Vishal Khandagale

Leave a Comment