Pune City News
पुणे शहरवडगावशेरी

‘प्रस्थापितांना 1 रुपयाचे उत्तर’: तुकाराम म्हस्केच्या सोशल मीडिया मोहिमेला जनतेचा जबरदस्त प्रतिसाद!

विमाननगर – वाघोली परिसरातील पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या तुकाराम मनोहर म्हस्के या युवकाने गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर एक वेगळी आणि धडाकेबाज मोहिम सुरू केली आहे—
“१ रुपया प्रस्थापितांना उत्तर!”

राजकारणात पैसे, पोस्टींग, गटबाजी, आणि बाहेरून आणलेल्या फंडाच्या जोरावर चालणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना थेट आव्हान देण्यासाठी तुकाराम यांनी ही वेगळी संकल्पना सुरू केली. सामान्य माणूस, सामान्य भावना आणि 1 रुपया— एवढ्याच आधारावर सुरू झालेली ही मोहीम आज प्रचंड गाजत आहे.

तुकाराम यांच्या या अभिनव मोहिमेला लोकांनी अक्षरशः उचलून धरले आहे.
एक हजार रुपयांपेक्षा जास्त निधी केवळ काही तासांत जमा झाला
✔ अनेकांनी “ही मोहीम म्हणजे राजकारणातील बाजाराला दिलेलं तोंडावरचं उत्तर आहे” असे म्हणत पाठिंबा दिला
✔ तरुण मतदार, महिलावर्ग आणि कष्टकरी वर्गाकडून विशेष प्रतिसाद मिळतो आहे

ही मोहीम आता केवळ निधी गोळा करण्यापुरती न राहता लोकांना स्वतःचा उमेदवार बनवण्याचा सामाजिक आंदोलनाचा चेहरा झाली आहे.

या सगळ्या बाजारपेठीकरणाला तुकाराम म्हस्के यांनी 1 रुपया या प्रतीकातून थेट विरोध केला आहे.

तुकाराम म्हस्के —
“प्रस्थापितांना कोट्यवधी लागतात, मला माझ्या लोकांचा एक रुपया पुरतो. माझ्या लोकांचा विश्वासच माझा सर्वात मोठा निधी आहे.”

ही ओळच आज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Related posts

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश

Vishal Khandagale

रेमडिसिव्हीर इंजेक्शनबाबत पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

पुणे परिसरातील रेल्वे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘Pune Area Decongestion Plan’ जाहीर

Vishal Khandagale

Leave a Comment