पुणे

BDP जागांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी 

महानगरपालिकेच्या हद्दीतील जैव वैविध्य उद्यानांच्यासाठी राखीव जागांवर (बीडीपी) BDP मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे चालू आहेत.

त्याकडे पालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ‘ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड’ने  पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

‘ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड’चे प्रदेशाध्यक्ष सनी लक्ष्मण निम्हण यांनी सोमवारी हे निवेदन पालिका आयुक्त कार्यालयात दिले.

पुण्यात नगरसेवक, लोकप्रतिनिधी देखील बीडीपी राखीव जागांवर प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामे करीत आहेत. सिंहगड आणि वारजे भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे.

हिंगणे, तुकाई नगर वडगाव, आंबेगाव, समर्थ नगर, टिळक नगर या सिंहगड रस्ता परिसरात तसेच बावधन, भूगाव मध्ये अनधिकृत बांधकामातुन बीडीपी चे आरक्षण गिळंकृत केले जात आहे, ही गंभीर बाब आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाला सांगून पाठपुरावा  कारवाई होत नसल्याने बांधकामे वाढून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. बीडीपी प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे सनी लक्ष्मण निम्हण यांनी केली आहे.

Related posts

पुणे महानगरपालिके हद्दीतील मृत्युपास देखील ऑनलाईन मिळणार….

Vishal Khandagale

JM रोडवर जप्त वाहनांना भीषण आग, 10 ते 15 गाड्या जळून खाक !

Vishal Khandagale

कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीची सर्वपक्षीय आढावा बैठक पार……

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.