जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने एक धक्कादायक इशारा दिला आहे.
कोरोनाचे थैमान आशिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्व देशांमध्ये कायम राहणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे.
दोन आठवडे कायम : गत 15 दिवसांपासून रोज जवळपास 1 लाखाहून अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने पुढील दोन आठवडे अशीच स्थिती कायम राहण्याचा इशारा दिला आहे.
संघटनेचे प्रमुख टेडरॉस एडहोम यांचे मत : चीनमध्ये 50 दिवसांनंतर पुन्हा एकदा बिकट स्थिती निर्माण झाली आहे. बीजिंगमधील 90 हजार लोकांच्या चाचण्या केल्या असून हे प्रकरण चीन चांगल्या पद्धतीने हाताळले असा जागतिक आरोग्य संघटनेला विश्वास आहे.
इशारा : चीनला काही मदत लागल्यास जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक तेथे जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग आफ्रिकेमध्येही वेगाने पसरत असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

