Pune City News
राष्ट्रीय

बाजारात मोदी मास्क; नागरिकांकडून भन्नाट प्रतिसाद !

कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशात कपडा व्यवसायिकांनी बाजारात नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचा मास्क आणला आहे.

या मास्कला मोठ्या प्रमाणात लोकांकडून मागणी येत आहे. विशेष म्हणजे मास्क खरेदी करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, कमलनाथ यांचे पर्यायही उपलब्ध आहेत.

भरपूर मागणी : आम्ही आतापर्यंत 500 ते 1000 मोदी मास्क विकले असून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मास्कलाही लोक पसंती देत आहेत. शिवाय राहुल गांधी, कमलनाथ यांच्या चेहऱ्याचे मास्कही आम्ही ठेवले आहेत,” अशी माहिती एका विक्रेत्याने दिली आहे. मोदींच्या मास्कला भरपूर मागणी असून लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी संगीयतले आहे.

कोरोनाचा फटका : कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसोबत मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगितले आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशचाही समावेश आहे. मध्य प्रदेशाता आतापर्यंत कोरोनाचे 11 हजार रुग्ण सापडले असून 465 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

Related posts

सीरम इन्स्टिट्यूट मध्ये भीषण आग

Vishal Khandagale

कोरोना; ठाकरे सरकारचे 10 महत्त्वाचे निर्णय

Vishal Khandagale

राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश

Vishal Khandagale

Leave a Comment