नाशिकमधील चलन मुद्रणालयात आणि परिसरात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नोटछपाई 3 दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुद्रणालयातील 40 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
एकूण कर्मचाऱ्यांपैकी दोन टक्के कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यामुळे गुरुवारपर्यंत कामकाज बंद ठेवण्यात आलं आहे.
नोटा छपाई, मुद्रांक, पारपत्र छपाई बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आय.पी.एस मजदूर संघाचे पदाधिकारी जगदीश गोडसे यांनी दिली.
मुद्रणालयापासून जवळच्या वसाहतीत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने मनपाने हे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून जाहीर केले आहे.
चलार्थपत्र (सीएनपी) आणि भारत प्रतिभूती हे मुद्रणालये 4 सप्टेंबर रोजी नियमित सुरू होणार आहेत.

