पुणेमहाराष्ट्र

पहिली भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद १५ जुलै पासून

पुणे शहर :- एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ MIT WORLD PEACE UNIVERSITY , पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती, आळंदी देवाची, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद’ गुरूवार, दि. १५ जुलै २०२१ ते रविवार, दि. १८ जुलै २०२१ या कालावधीत ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहे.

भारतीय संतसाहित्यामध्ये अनेक वैज्ञानिक व तात्त्विक तथ्यांचा उल्लेख आढळतो. अर्थात भारतीय संतांना भारतीय ज्ञानपरंपरेतून उपजलेल्या अनेक शोधांबद्दल माहिती होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अनेक पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांच्या नावे असलेले शोध हे पूर्वी भारतामध्ये लागले असल्याचे आता जगासमोर आले आहे. म्हणजेच, ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, भक्ती, श्रद्धा या सर्वांचा ऊहापोह करणारे संतसाहित्य ह्याचा उच्चशिक्षणात समावेश होणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर, सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये संतसाहित्याचा अंर्तभाव नाही, तसेच हे संतसाहित्य काळाच्या कसोटीवर उतरलेले असून, ते धार्मिंक नाही, तर पूर्णंपणे वैज्ञानिक आहे, यावर या परिषदेत विचारमंथन होईल.

एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल वि. कराड यांची संकल्पना आणि पुढाकारातून ही पहिली भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद संपन्न होत आहे.

या परिषदेचा उद्घाटन समारंभ गुरूवार दि. १५ जुलै २०२१ रोजी दुपारी २ वा. होणार आहे. यासाठी मा. ना. श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री, हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून प्रस्तावित असून, मा. श्री. विष्णू कोकजे, माजी राज्यपाल, हिमाचल प्रदेश व ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ कीर्तंनकार व प्रवचनकार ह.भ.प.श्री किसन महाराज साखरे, हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष व तत्त्वज्ञ प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे ‘आमचे संत तत्वज्ञ नव्हते का?’ या विषयावर बीजभाषण देणार आहेत.

समारोप सत्र रविवार, दि. १८ जुलै २०२१ रोजी दुपारी ४.३० वा. होईल. या समारंभासाठी सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मोहन भागवतजी, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे प्रस्तावित असून, जगविख्यात संगणक तज्ञ, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, आयसीसीआरचे चेअरमन, राज्यसभेचे खासदार मा. श्री. विनय सहस्रबुद्धे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ दा कराड हे सन्माननीय अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेमध्ये खालील सहा सत्रे होणार आहेत.

  • पहिले सत्रः संतसाहित्य – समृद्ध जीवन जगण्याचे आधुनिक शास्त्र
    वक्तेः डॉ. मिलिंद जोशी, ह.भ.प.श्री ज्ञानेश्‍वर महाराज वाबळे. ह.भ.प.श्री जगन्नाथ महाराज पाटील, ह.भ.प.श्री. गुरुबाबा महाराज औसेकर, ह.भ.प.श्री. प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.श्री. अच्यूत महाराज दस्तापूरकर व ह.भ.प.श्री. रामकृष्ण लहवितकर
  • दुसरे सत्रः. वारकरी संप्रदाय विचार : आधुनिक की कालबाह्य?
    वक्तेः इंद्रजीत भालेराव, भागवताचार्य ह.भ.प.श्री. माधव महाराज राठी, अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले, ह.भ.प.श्री. योगीराज महाराज गोसावी व ह.भ.प.श्री. उध्दव महाराज मंडलिक आणि हरीहर महाराज दिवेगावकर
  • तिसरे सत्रः भारतीय संतविचाराचे खच्चीकरण इंग्रजी शिक्षणपद्धतीने केले काय?
    वक्तेः ह.भ.प.श्री उल्हास दादा पवार, कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिंगबर तु. शिर्के, ह.भ.प.श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर, श्री. चारुदत्त आफळे, डॉ. विवेक सावंत, श्री. भावार्थ देखणे, डॉ. पुष्पिता अवस्थी व ह.भ.प.श्री चंद्रकांत महाराज वांजळे
  • चौथे सत्रः संत आणि आरोग्य व्यवस्थापन
    वक्तेः डॉ. बालाजी तांबे, डॉ. तात्याराव लहाने, ह.भ.प.श्री अर्जुन महाराज लाड, ह.भ.प.श्री मुकुंद महाराज जाडदेवळेकर, बाळासाहेब बडवे, डॉ. विश्‍वास सापत्नेकर, ह.भ.प.श्री केशव महाराज उखळीकर.
  • पाचवे सत्रः आमच्या तत्त्वज्ञ संतांना धार्मिक कोणी ठरविले?
    वक्तेः ह.भ.प.श्री संजय महाराज धोंडगे, ह.भ.प.श्री तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा-दैठणेकर, डॉ. विजय भटकर, महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ ईंश्‍वरानंद ब्रह्मचारी श्री उत्तमस्वामीजी महाराज, पं. वसंतराव गाडगीळ, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. विजय कुमार फड, श्री उत्तम स्वामीजी महाराज व ह.भ.प.श्री. सुदाम महाराज पाणेगावकर
  • सहावे सत्रः भारतीय शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय संत गौण का?
    ह.भ.प.श्री चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प.श्री दिनकर शास्त्री भुकेले, एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, डॉ. अभय टिळक, आचार्य स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वती महाराज, डॉ. श्रीनिवास वरखेडी आणि ह.भ.प.श्री धर्मराज हांडे.

या परिषदेमध्ये इतर अनेक नामवंत शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, संत साहित्याचे अभ्यासक आपले विचार मांडतील. या परिषदेतील प्रत्येक सत्रात विशेष ठराव पारित करून, शिक्षणाबाबत रुपरेषा ठरविण्यासाठी राज्य/केंद्र शासनाकडे पाठविण्यात येतील.
अशी माहिती श्री क्षेत्र देहू संस्थानचे माजी अध्यक्ष, तत्त्वज्ञ संत श्री तुकाराम महाराज यांचे वंशज आणि पहिल्या भारतीय संत साहित्य उच्चशिक्षण परिषदेच्या संयोजन समितीचे कार्याध्यक्ष ह.भ.प.श्री. रविदास महाराज शिरसाठ, समन्वयक डॉ. संजय उपाध्ये व डॉ. महेश थोरवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी सर्वांसाठी प्रेरणादायी; उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

लॉकडाऊन ४ : – काय सुरू राहाणार, काय नाही?

Vishal Khandagale

लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी’ करण्याचा निर्णय घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX