पुणेमहाराष्ट्र

बिडीचे बदलणार नाव : साबळे आणि वाघिरे कंपनीचा निर्णय

पुरंदरच्या पायथ्याशी करण्यात आलेल्या उपोषणाला यश मिळत असून संभाजी ब्रिगेडला यश मिळाले आहे. संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे आणि वाघिरे कंपनीकडून घेण्यात आला असल्याचे, प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

संभाजी ब्रिगेडकडून हा लढा अनेक वर्षांपासून लढला जात होता. यासाठी काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्येही
संभाजी बिडी विरोधात आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी वाघिरे कंपनीकडून प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन आणि इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भावनेचा आदर करुन आम्ही विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघेरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी सांगितले आहे.

तसेच कंपनी आपल्या उत्पादनासाठी नवीन नाव कायदेशीर प्रक्रियेने नोंदवणार आहे. म्हणजेच संभाजी बिडीऐवजी नवं नाव रजिस्टर केलं जाईल. जेणेकरुन हे नवीन नाव ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल, असं कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Related posts

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने…

Vishal Khandagale

पुण्यातील तीन मित्रांनी दिला 1100 विद्यार्थ्यांना आधार !

Vishal Khandagale

बालेवाडी श्री. शिवछ्त्रपती क्रीडा संकुलात १ हजार बेड्स तयार !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX