एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
- एमडीची परीक्षा आम्ही घेतली आहे. मात्र, कोरोनामुळे एमबीबीएसच्या तिन्ही वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या, असे देशमुख म्हणाले आहेत.
- राज्यात कोरोनाची दुसरी लाट अभूतपूर्व आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येणं स्वाभाविक आहे.
- मात्र, आता 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत आहे आणि स्थिती सुधारत आहे.
- दरम्यान, हे संकेत दिलासादायक असून लॉकडाऊनचे सकारात्मक संकेत असल्याचे देशमुख म्हणाले आहेत.

