Pune City News
महाराष्ट्र

राज्य सरकारच्या अटींचा अडथळा : विरोधी पक्षनेते

Pune City News :- लॉकडाऊनच्या काळात गरिबांना रेशन दुकानांतून धान्य देण्यात केंद्र सरकारने कुठल्याही अटी घातल्या नाहीत. राज्य सरकारनेच त्यासाठी अटी घातल्या असून त्या अटी मागे घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

◆ निर्णय : रेशन दुकानांमध्ये धान्याचा साठा करण्यासाठी नसलेली पुरेशी व्यवस्था, दुकानांमध्ये होणारी गर्दी व तीन महिन्याचे धान्य एकत्र मिळाल्यास ते विकले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने तीन महिन्याचे धान्य एकावेळी न देण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ राज्य सरकारवर टीका : पुढील तीन महिन्यांचे धान्य रेशन दुकानातून देताना केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवली नाही. मात्र राज्य सरकारने अनेक अटी टाकल्या आहेत. आधी विकत मिळणारे रेशन घेतले तरच पुढचे धान्य मोफत मिळेल.जे नियमित धान्य घेतात त्यांनाच ते मिळेल, अशा स्वरूपाच्या अटी आहेत. या अटी मागे घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

Related posts

उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण नाशिक जिल्ह्यात.

Vishal Khandagale

भाजपतर्फे आजपासून ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

Vishal Khandagale

पोलीस भरतीत मराठा समाजाला न्याय देणार

Vishal Khandagale

Leave a Comment