Pune City News :- महाराष्ट्रात आज नवीन चार रुग्ण आढळले असून पुण्यात तीन तर साताऱ्यात एक रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 101 पोहोचला आहे.
महाराष्ट्रात काल उशिरापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 97 एवढी होती, परंतु त्यामध्ये आणखी चार रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे सातारा, सांगली सारख्या ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त आढळल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा काळजीत पडली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अगोदर जमावबंदी आणि नंतर संचारबंदीचा लागू केली असून लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
previous post

