Pune City News
पुणे

रेल्वे स्टेशन मास्तरांचे अन्नत्याग आंदोलन

रात्रपाळीची सिलिंग मर्यादेचा आदेश रद्द करावा, रेल्वेचे खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, जुनी पेन्शन याेजना लागू करावी, काेराेना काळात आघाडीवर राहून रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा कवच द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी रेल्वे स्टेशन मास्तरांनी अन्नत्याग आंदोलन केले.

पुणे स्टेशनजवळील रेल मंडल कार्यालय (DRM OFFICE ) येथे हे आंदोलन करून स्टेशन मास्तरांनी त्यांचा निषेध नाेंदवला. देशातील स्टेशन मास्तरांच्या ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनच्या AISMA वतीने देशभर हे आंदोलन झाले. आंदोलनाचा हा सहावा टप्पा होता.

याआधी रेल्वे बाेर्ड अधिकाऱ्यांना ७ ऑक्टोबर राेजी प्रथम ईमेल पाठवून विराेध दर्शवला. त्यानंतर १५ ऑक्टोबर राेजी रात्रपाळी दरम्यान देशातील स्टेशन मास्तर यांनी कामाचे ठिकाणी मेणबत्ती पेटवून विराेध दर्शवला.

तिसऱ्या टप्प्यात २० ते २६ ऑक्टोबर दरम्यान गणवेशावर काळी पट्टी लावून गाडी संचालन करत मागण्या मान्य करावेत, अशी विनंती केली.

चाैथ्या टप्प्यात ३१ ऑक्टोबर राेजी देशातील स्टेशन मास्तर यांनी एकदिवसाचे उपाेषण करत विराेध दर्शवला. तर, पाचव्या टप्प्यात स्टेशन मास्तर यांनी धरणे आंदोलन केले. त्यांनतर आजचे अन्नत्याग आंदोलन केले.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंदरात्रे, मंडल अध्यक्ष अमित वर्मा, मंडल सचिव शक़ील इनामदार, दिनेश कांबळे, एस के मिश्रा, अजय सिन्हा, अर्जुन कुमार, प्रल्हाद कुमार, मैथ्यू जार्ज, जे आर तांडले, सुनील गुप्ता, मनाली कुलकर्णी हे पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

रेमडिसिव्हर इंजेक्शनची बेकायदा विक्री; तिघांवर गुन्हा

Vishal Khandagale

कोरोना : ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम यांनी केली पाहणी

Vishal Khandagale

पुणे शहरातील पहिला 400 KW सौर ऊर्जा प्रकल्प कोंढव्यातील थ्री ज्वेल्स अपार्टमेंटमध्ये सुरू

Vishal Khandagale

Leave a Comment