गुन्हे विषयक

हडपसरमध्ये पुन्हा सराईताचा खून !

Pune City News:- पुण्यातील हडपसर परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनेने हादरला आहे.दोन दिवसांपूर्वी याठिकाणी शोएब शेख नावाच्या व्यक्तीचा खून झाला होता.मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका सराईताचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे.

▪️बसवराज उर्फ बश्या कांबळे (२३) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे.याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.बसवराज हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता.

तसेच तो हडपसर परिसरातील ७३ ग्रुपचा अध्यक्ष होता. मध्यरात्री बसवराज हा एका ठिकाणी बसला असताना अज्ञातांनी येऊन त्याला मारहाण करून त्याचा दगडाने ठेचून खून केला.

▪️सदरील घटना आज (मंगळवारी) सकाळी उघडकीस आल्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.दरम्यान, गुन्हा दाखल करण्याचे काम अद्याप सुरू आहे.

Related posts

उपराष्ट्रपतीं विरोधात आक्षेपार्ह पोस्ट; बारामतीत गुन्हा

Vishal Khandagale

खराडी पोलिसांची मोठी कारवाई – ४ कोटी २७ लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्य टोळी उद्ध्वस्त, ६ जण अटकेत

Vishal Khandagale

मंडप व्यासायिकाची गळफास घेऊन आत्महत्या…..

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.