कोरोनाराष्ट्रीय

ऑक्सफर्डने बनवलेली लस चे यशस्वी पाऊल …

Pune City News:- कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ब्रिटन मधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटने लस विकसित केली आहे. लसीच्या चाचण्या सुरु असून समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत.
ऑक्सफर्डच्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एक महत्वाचा अडथळा पार केला असून माणसांप्रमाणे प्राण्यांवर करण्यात आलेल्या लस चाचणीचा निष्कर्ष आश्वासक आहे.
कोणत्याही नवीन आजाराशिवाय फुफ्फुसाचे नुकसान रोखण्यात “ChAdOx1 nCoV-19” लस परिणामकारक ठरली असून सहा माकडांना SARS-CoV-2 विषाणूचा डोस देण्यात आला.

याच विषाणूमुळे जगभरात Covid-19 चा फैलाव झाला. या लसीच्या मानवी चाचणी कार्यक्रमात १ हजार स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. तज्ज्ञांनी लस चाचणीच्या निष्कर्षांचे कौतुक केले असून ज्या माकडांना कोरोनावरील ही लस देण्यात आली. त्यांना न्युमोनियाची बाधा झाली नाही असे डॉ. पेन्नी वॉर्ड यांनी सांगितले.
*LetsUp

Related posts

एक देश एक रेशन कार्ड’ योजना सुरु!

Vishal Khandagale

कुटुंब नियोजनाची सक्ती करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

Vishal Khandagale

मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस लॉकडाऊन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.