Pune City News :- कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर येथे ईसम नामे संदिप मारुतीराव बधे वया.४९ वर्षे, धंदा – व्यवसाय रा.सा.नं.५४, बधे शाळेजवळ, बधेनगर, खडीमशीन चौकीजवळ, कोंढवा बुद्रुक, पुणे. हे दिनांक २०/१२/२०१९ रोजी शिवाजी नगर येथे कामानिमीत्त गेले असता त्यांचे घराचे पहिल्या मजल्यावरील लोखंडी शटरचे लॉक तोडून वा दरवाजाचे लॅच तोडून आत प्रवेश करून बेडरुममधील कपाटात ठेवलेला सोन्याची, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ९,७३,०००/- (अक्षरी रक्कम रुपये नऊ लाख त्र्याहत्तर हजार फक्त) चा माल फिर्यादी यांचे संमतीशिवाय घर फोडी करून चोरुन नेला सबब त्यानी दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुरन. १००१/१९ भादवि कलम ४५४.३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यांतील आरोपी हा बलरगी ता.अफजलपुर जि.गुलबर्गा राज्य-कर्नाटक, येथे असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे नेमणुक गुन्हे प्रगटीकरण शाखा कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर याना प्राप्त झाल्याने लागलीच त्यानी दाखल गुन्हयांतील आरोपीतांस अटक करण्याबाबत पोउनि शिंदे यांनी श्री विनायक गायकवाड़ वपोनि कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर व श्री महादेव कुंभार पोनि गुन्हे महादेव कुंभार याना कळविले असता लागलीच वपोनि व पोनि गुन्हे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पोउनि शिंदे यांचे अधिपत्याखाली एक टीम तयार केली त्यामध्ये कोंढवा पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस फौजदार इक्बाल शेख पोलीस हवालदार योगेश कुंभार पोलीस हवालदार सुरेश भापकर पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे पोलीस नाईक कौस्तुभ जाधव पोलीस नाईक गणेश आगम पोलीस शिपाई अजीम शेख पोलीस शिपाईं मोहन मिसाळ यांचा समावेश करुन सदर टिम कर्नाटक राज्यामध्ये तात्काळ रवाना केली सदर टिम कर्नाटक राज्यामधील बलरगी ता. अफजलपुर
जि.गुलबर्गा या ठिकाणी जावुन पोहचली त्यानी स्थानिक पोलीसांचे मदतीने दाखल गुन्हयांतील आरोपी नामे काशिनाथ चंद्रकांत गायकवाड वय.२८वर्षे रा.सध्या रा.बुध्द मंदीरा जवळ, किरकटवाडी, ता. हवेली जि.पुणे. मुळ रा.गाव- बलरगी ता.अफजलपुर जि.गुलबर्गा राज्य-कर्नाटक यांस दिनांक ०७/०४/२०२० रोजी अटक केले त्यास
मा.न्यायालयाने दिनांक ११/०४/२०२० रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली त्याचेकडे पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला असता संबंधित आरोपी यांने दुधणी ता.अक्कलकोट जि.सोलापुर या ठिकाणी दाखल गुन्हयांतील ३३ तोळे वजनाचे दागिने जप्त करुन घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे सद्दस्थितीला संपुर्ण देशामध्ये कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव झाला आहे. सबब त्याअनुषंगाने संपूर्ण भारत देशामध्ये मा.प्रधानमंत्री भारत सरकार यानी संपुर्ण भारत देशामध्ये लॉकडावुन करण्यात आले आहे त्याअनुषंगाने मा.सहपोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सी आर पी सी १४४(१)(३)नुसार संचारबंदीचे आदेश देखील पारित केलेले आहेत अश्या गंभीर परिस्थीती मध्ये देखील आपले कर्तव्य पार पाडुन वर नमुद पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी
उत्कृष्ठ कामगिरी पार पाडली आहे सदरची कामगिरी ही श्री सुनिल फलारी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांचे
सुचनांप्रमाणे मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ पुणे शहर श्री सुहास बावचे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री सुनिल कलगुटकर कोंढवा पोलीस ठाण्याचे वपोनि श्री विनायक गायकवाड कोंढवा पोलीस ठाण्याचे पोनि गुन्हे महादेव कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वा सुचने प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे,सहाय्यक पोलीस फौजदार इक्बाल शेख, पोलीस हवालदार योगेश कुंभार, पोलीस हवालदार सुरेश भापकर,पोलीस नाईक पृथ्वीराज पांडुळे पोलीस नाईक कौस्तुभा जाधव पोलीस नाईक गणेश आगम, पोलीस शिपाई अजीम शेख, पोलीस शिपाईं मोहन मिसाळ यानी केलेली आहे

