Pune City News
राष्ट्रीय

कोवीड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा योग्य वापर करावा

remidi

कोविड- १९ च्या उपचारासाठी औषध, नियंत्रकांनी भारतातील ठराविक औषध उत्पादक कंपनींना रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे.

या औषधांची उत्पादन क्षमता व मागणीमध्ये तफावत आहे. त्यामुळे बाजारात या औषधांचा तुटवडा असल्याने गरजू रुग्णांना वेळेत ही औषधे मिळत नाहीत.

कोवीड – १९ रुग्णांना ट्रीटमेंट सुरु करण्याबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल- कोवीड- १९ प्रसिध्द केला आहे. या प्रोटोकॉल नुसार रेमडेसिवीर इंजेक्शन हे फक्त मॉडीरिट कंडीशन (ऑन ऑक्सीजन) असलेल्या रुग्णास देण्याच्या सूचना केल्या.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी रेमडेसिवीर इंजेक्शन व टॉसिलिझुमॅब इंजेक्शन च्या वापराबाबत प्रशासकीय अधिका-यांना मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या असून त्याची प्रत इंडीयन मेडीकल असोसिएशन यांना देखील पुरवण्यात आली आहे.

हॉस्पीटलमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे निर्गमीत केलेल्या प्रोटोकॉल नुसार पूर्णपणे तपासणी व आवश्यक चाचण्या करुनच रुग्णाची स्थिती बघून आवश्यकतेनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन चा वापर करणे आवश्यक आहे.

हे औषध कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्ण व त्याचे नातेवाईक औषधे मिळण्यासाठी धावपळ करतात, ही बाब योग्य नाही. तसेच रुग्णालयातील वॉर्डबॉय/नर्सिंग स्टाफ ने रुग्णांच्या नातेवाईकांकडून औषध उपलब्ध करून देण्यासाठी जास्त पैशांची मागणी करणे अत्यंत गंभीर आहे.

Related posts

‘फोर्ब्स’ची 100’ श्रीमंतांची यादी जाहीर; कोरोना लस तयार करणारे ‘हे’ टॉप टेनमध्ये

Vishal Khandagale

देशात भरात 1.90 लाखापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण

Vishal Khandagale

पाकिस्तानने भारताची ‘ही’ मागणी केली मान्य

Vishal Khandagale

Leave a Comment