Pune City News
पुणे

मराठी विषयाचा प्रश्नसंच सोशल मीडियावर व्हायरल; विद्यापीठाकडून होणार कारवाई

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या मराठी विषयाच्या परीक्षेचा बहुपर्यायी प्रश्नांचा प्रश्नसंच परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सत्य असून सोशल मीडियावर फिरत असलेले प्रश्न वगळून इतर प्रश्न काढण्याचे काम सध्या सुरू आहे. परीक्षेत व्हायरल झालेले प्रश्न येणार नाही याची खबरदारी घेतली जात असल्याची माहिती मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांनी दिली.

या प्रकरणामुळे मराठी विषयाच्या परीक्षेचे काम वाढले आहे. परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देणाऱ्या संबंधित प्राध्यापकांवर विद्यापीठातर्फे कारवाई केली जाणार आहे. असल्याचे विद्यापीठ प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेले प्रश्न परीक्षेत विचारले जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांकडून अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न तयार करण्याची जबाबदारी काही प्राध्यापकांना देण्यात आली. त्यात पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयातील आणि बारामती परिसरातील महाविद्यालयातील दोन महिला प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या परीक्षेसाठी तयार केलेले प्रश्न विद्यार्थ्यांना पाठविले. परीक्षेपूर्वीच प्रश्न विद्यार्थ्यांना मिळाल्याने एकाच गोंधळ उडाला. परिणामी विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांना दिले आहे.

Related posts

औषध विक्रीसाठी आता वेळ आणि दिवस ….

Vishal Khandagale

फिनिक्स मॉल मध्ये लागली “आग”

Vishal Khandagale

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने…

Vishal Khandagale

Leave a Comment