Pune City News
गुन्हे विषयक

सनी हिवाळे टोळीवर मोकाची कारवाई

वानवडी परिसरात दहशत निर्माण करणा-या गिरीष उर्फ सनी महेंद्र हिवाळे टोळीतील ७ जणांविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का ) नुसार कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमध्ये टोळीतील दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याविरूद्ध कारवाईचे आदेश पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिले आहेत.

सनी हिवाळे, आकाश संतोष भारती, चेतन पांडूरंग ढेबे, अनिकेत उर्फ मॉन्टी शरद माने, काजल मधुकर वाडकर, आंबिका अर्जुन मिसाळ, सूरज महादेव नवगीरे अशी मोक्का नुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

सनी हिवाळे हा टोळीप्रमुख असून टोळीवर खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, दरोडा, खंडणी असे गुन्हे दाखल आहेत. टोळीच्या विरोधात मोकाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

 

Related posts

नक्षलवाद्यांनी जवानांची बस भूसुरुंग स्फोटाने उडवली, 5 जवान शहीद

Vishal Khandagale

सासवड येथे जुगार अड्ड्यावर छापा; ३० जण ताब्यात

Vishal Khandagale

राज्यातील पोलिसांचे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Vishal Khandagale

Leave a Comment