Pune City News
गुन्हे विषयकराष्ट्रीय

नक्षलवाद्यांनी जवानांची बस भूसुरुंग स्फोटाने उडवली, 5 जवान शहीद

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर मोठा हल्ला केला आहे. जवानांनी भरलेली बस नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोटाने उडवून दिली. या घटनेत 5 जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात शहीद झालेले जवान हे डीआरजीचे होते.या घटनेत बस चालकासह दोन जवान जागेवरच शहीद झाले.

● या स्फोटात एकूण 14 जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

● नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची मोहीम सुरू आहे. यादरम्यान डीआरजीचे जवान नक्षवाद्यां विरोधातील मोहीमेवरून परतत असताना एका पुलावरून त्यांची बस जात होती.

यावेळी नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. दुपारी ४.१५  वाजता  सुमारास ही घटना घडली, अशी माहिती पोलीस महासंचालक अशोक जुनेजा यांनी दिली.

Related posts

118 चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया

Vishal Khandagale

देशात 100% जनता कर्फ्यु !

Vishal Khandagale

कर्वेनगर परिसरात पत्नीला मारून ज्येष्ठाची गळफास घेऊन आत्महत्या !

Vishal Khandagale

Leave a Comment