Pune City News
पुणे

अखेर दुकाने उशिरापर्यंत सुरू राहण्यास परवानगी

पुणे शहरातील दुकाने आता सकाळी ९ ते सायंकाळी ९ पर्यंत उघडी ठेवण्यास महानगर पालिकेने अखेर परवानगी दिली आहे. आज ( शुक्रवारी) सायंकाळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत आदेश काढले.

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ९ पर्यंत सुरू राहणार आहेत.

नवरात्र, दसरा आणि दिवाळी सण तोंडावर आले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडूनही ही मागणी सातत्याने केली जात होती. या निर्णयामुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनाही रात्री उशिरापर्यंत खरेदी करता येणार आहे.

Related posts

पुणे परिसरातील रेल्वे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘Pune Area Decongestion Plan’ जाहीर

Vishal Khandagale

कोरोना: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील तपासणी अहवाल

Vishal Khandagale

लसीबाबत पूनावाला यांनी दिली खूशखबर

Vishal Khandagale

Leave a Comment