Pune City News
पुणेमहाराष्ट्र

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ संजीवन समाधी सोहळा…

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा रविवारी (दि.१३) दुपारी साडे बारा वाजता भक्तिमय वातावरणात पार पडला.

निमंत्रित भाविकांनी याच देही याच डोळा हा सोहळा आपल्या डोळ्यांत साठवत संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

तत्पूर्वी, माउलींना पवमान अभिषेक व दूधआरती घालून पहाटे ३च्या सुमारास प्रमुख विश्वस्त डॉ.अभय टिळक यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

नामदेवराय यांच्या वतीने श्रींची महापूजा घेण्यात आली.सकाळी दहा वाजता हैबत बाबा पायरी पुढे कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात झाली.

सकाळी १० वाजता संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज हभप. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे समाधी सोहळा वर्णनपर कीर्तन झाले.

मंदिराच्या महाद्वारात हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले.दुपारी पावणे बाराच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

घंटानाद, अभिषेक आणि माउलींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून आरती करण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांमार्फत माउलींच्या समाधीच्या पुढे विराजमान करण्यात आल्या. नंतर मंदिराला प्रदक्षिणा मारून महाद्वारातून बाहेर पडल्या.

या सोहळ्याप्रसंगी खासदार संजय जाधव, संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ.अभय टिळक,विश्वस्त ऍड.विकास ढगे पाटील, योगेश देसाई, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माऊलींचे चोपदार राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे भाविक उपस्थित होते.

Related posts

पुणे महापालिकेचे आरोग्य पथकं झोपडपट्टी भागात करणार आरोग्य तपासणी

Vishal Khandagale

दोन्ही महापालिका व प्रतिबंधित क्षेत्र वगळून उद्योग, कारखाने सुरु करता येणार !

पुणे जिल्ह्यात २ लाख ६ हजार २९० कोरोनाबाधित रुग्ण

Vishal Khandagale

Leave a Comment