Pune City News
पुणे शहर

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ पुणे शहर भाजपच्या वतीने निषेध आंदोलन

पुणे शहर :- पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तांध तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेला हिंसाचार ही लोकशाहीची हत्या आहे.

या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आज राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करीत आहेत. त्याचा भाग म्हणून पुणे शहर भाजपच्या वतीने आज महात्मा गांधी पुतळा पुणे स्टेशन येथे आंदोलन करण्यात आले.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत.

भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे, असे प्रकार घडत आहेत. पुणे शहर भाजपच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करीत आहोत.

यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, धिरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येणपुरे, दिपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर आदी उपस्थित होते.

Related posts

शहरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

Vishal Khandagale

पुणे महापालिकेचे उपायुक्त श्री. संदीप कदम यांचे वतीने शहरातील तळागाळातील नागरिकांसाठी दिले ….

Vishal Khandagale

पुणे शहरात विक्रमी ६२२५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Vishal Khandagale