PUNE CITY NEWS :- गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची अनावश्यक गर्दी टाळून ‘घरातील गणपती, घरीच विसर्जन करावे’ या आपल्या पुणे महापालिकेच्या आवाहनासंदर्भात महापालिकेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
बैठकीत घरातील गणपतीचे, घरीच विसर्जन व्हावे यासाठी जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोचविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध करून दिले आहेत त्याची माहिती घेतली. मूर्तीदान करणाऱ्यांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात प्रभागनिहाय मूर्तीसंकलन केंद्र किती ठिकाणी करणार याची माहिती घेतली.
महापालिकेमार्फत पुरविण्यात येणार्या अमोनियम बायकार्बोनेटची वितरण व्यवस्था संदर्भात माहिती घेण्यात आली. तसेच फिरत्या हौदाचा मार्ग कसा असावा, वेळापत्रक कसे असावे अशा अनेक गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भातील आढावा या बैठकीत घेण्यात आला.

