पुणे शहर :- एका तरुणाने आपल्या नजरेतून चंद्राच्या छोट्या-छोट्या भागांचे जवळपास तब्बल ५५ हजारहून अधिक फोटो काढले आहेत. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्याच्यावर लोकांकडून कौतुकाचा तुफान वर्षाव होतोय. चला तर पाहूया चंद्रवेड्या तरुणाची लयभारी कामगिरी…
● पुण्यातील या तरुणाचे नाव आहे प्रथमेश जाजू चंद. तो ज्योर्तिर्विद्या परिसंस्था येथे काम करतो.
● त्याने ३ मेच्या रात्री एक ते पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान आपल्या घराच्या टेरेसवरून चंद्राचे जवळपास ५५ हजार फोटो काढलेत.
● यामध्ये चंद्राच्या छोट्या-छोट्या भागांचा समावेश होता. प्रथमेशने टेलिस्कोप व त्याच्याजवळ असणाऱ्या कॅमेऱ्याने ही किमया साधली आहे.
● यासाठी प्रथमेशकडे एक वेगळा कॅमेरा असून त्यात अगोदर व्हिडिओ निघतो आणि त्यातून मग २००० फोटो आपल्याला मिळतात.
● दरम्यान त्याने एकूण ३८ व्हिडिओ काढले. त्यातील २५ व्हिडिओ हे २००० फोटोंचे होते तर उरलेले काही ५०० ते ७०० फोटोंचे होते.
● हे सर्व मटेरियल जवळपास १०० जीबीचे होते. व्हिडिओतुन आलेल्या सगळ्या फोटोंचा एक फोटो मर्ज करत गेलो. बाकीचे सगळे फोटो मर्ज केल्यानंतर त्यांना फोटोशॉप स्पीच केले. त्यानंतर फोटो तयार झाला.
● हा फोटो म्हणजे अद्भुत कलाविष्काराचा उत्तम नजराणा आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.




