Pune City News:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या शुल्कवाढीच्या निर्णयाला विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत आज शनिवारी एका वर्षासाठी स्थगिती देण्यात आली.
तसेच कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीत पुणे,अहमदनगर व नाशिक या निर्णयाने तीनही जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी विद्या परिषदेची बैठक पार पडली.त्यात विद्यापीठ प्रशासनातर्फे सादर करण्यात आलेल्या शुल्कवाढी संदर्भातील प्रस्तावाला एक मताने मंजुरी मिळाली.

