Pune City News
कोरोनापुणे

पुण्यातील उद्योजका कडून ससूनला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट…!

Pune City News :- कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येवर मात करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ससून रुग्णालयाला उद्योजक अविनाश भोसले यांनी “प्लाझ्मा फोरेसेस” मशीन भेट दिली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव आयसीएमआरकडे पाठविण्यात आला असून परवानगी प्राप्त झाल्यावर उपचार सुरु करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.या मशिनव्दारे प्लाझ्मा वेगळा काढला जावू शकतो आणि हा प्लाझ्मा कोविड रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जावू शकतो. असा प्लाझ्मा १८ वर्षावरील पुरुष किंवा महिला व्यक्ती देवू शकते. तथापी संबंधित महिला अद्यापर्यंत गर्भवती राहिलेली नसावी. तसेच त्या व्यक्तीचे वजन ५५ किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीच्या कोविड-१९च्या शेवटच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. तथापी प्लाझ्मा डोनेट करण्यापूर्वी मागील २८ दिवसात या व्यक्तीमध्ये कोविड-१९ ची कोणतीही लक्षणे आढळलेली नसावीत.संबंधित व्यक्ती हिपॅटाइटिस- बी तसेच एचआयव्ही बाधित नसणे आवश्यक आहे. अशी माहिती डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

Related posts

काँग्रेस गटनेतेपदी नगरसेवक बागुल यांची निवड

Vishal Khandagale

पुणे शहरात भाज्यांचा तुटवडा

Vishal Khandagale

पुण्यातील पाच रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करणार

Vishal Khandagale

Leave a Comment