Pune City News
पुणे

ज्यू धर्मीय बांधवांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश

पुणे शहर अल्पसंख्य आघाडीचे अध्यक्ष अली दारूवाला यांच्या विशेष प्रयत्नाने हा प्रवेश लाल देऊळ सिनेगॉग येथे पार पडला. यावेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे  बोलत होते.

भाजपसोबत ज्यू समुदाय नेहमी जवळचा राहिला आहे. त्यामुळे ज्यू समुदय आज प्रत्यक्ष कार्यरत होत असल्याचा आनंद होत आहे, तसेच अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न भाजपकडून सोडवले जातील, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

ज्यू अल्पसंख्य समुदायाचे राज्यातील प्रमुख डॉ. डॅनियल पेणकर आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी( दि.१६)रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला

यावेळी पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा देशातील, जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. देशात भाजपचे राज्य आहे. अशा पक्षा सोबत ज्यू समुदायाचे नाते जोडले जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.

पक्षाची सदस्य संख्या, जनाधार सतत वाढत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत मागील मताधिक्याचा विक्रम तोडला जाईल, याची खात्री अशा कार्यक्रमांमधून होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपशी ज्यू समुदाय सतत संबंधित राहिला आहे. आता प्रत्यक्ष कार्यरत होत आहे, ही आनंदाची बाब आहे. अल्पसंख्य समाजाचे प्रश्न भारतीय जनता पक्ष सोडवेल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Related posts

नौदलाचा अधिकारी असल्याचे भासवून लाखोंचा गंडा घळणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

Vishal Khandagale

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आगाखान पॅलेसमधून वारसा पदयात्रा

Vishal Khandagale

महानगरपालिकेकडून स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात

Vishal Khandagale

Leave a Comment