Pune City News
गुन्हे विषयक

पेट्रोल पंपावर दारोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले

पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी शस्त्रासह अटक केली.

याप्रकरणी पोलीस हवालदार संजय बरकडे यांनी फिर्याद दिली आहे. दांगटमळा परिसरात ही घटना घडली आहे.

अमेय सुधाकर मारणे (वय २५, रा. दांडेकर पुल, पुणे) मंदार श्रीधर दारवटकर (वय २४ रा. वडगाव-बुद्रुक सोसायटी, पुणे) जयेश लक्ष्मण भुरुक (वय २२, रा.घबाडे वस्ती, वडगाव बुद्रुक,पुणे) राहुल मच्छिंद्र कांबळे (वय २२, रा.माणिकबाग सिंहगड रोड, पुणे) ऋतिक संभाजी वाघमारे (वय २१, रा.गोसावी वस्ती, वडगाव-बुद्रुक,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या आरोपींनी बेकायदेशीररित्या हत्यारे जवळ बाळगली होती. सर्वजण हत्याराची व साथीदार एकत्र येऊन सिंहगड रोडवरील शहा पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र पोलिसांनी त्याच्या आत त्यांना ताब्यात घेतले.

Related posts

होमिओपॅथिक क्लिनिकला पुणे महानगरपालिकेचा दणका

Vishal Khandagale

सांगवीतील “सैराट”प्रकरणी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Vishal Khandagale

पोलीस उपनिरीक्षकाचा महिलेवर अत्याचार

Vishal Khandagale

Leave a Comment