Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस लॉकडाऊन

Pune City News : पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना विषाणूचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. मोदी म्हणाले, देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी आज मी इथे मोठी घोषणा करत आहे. ध्यान देऊन ऐका. आज रात्री बारा वाजेपासून 21 दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल,’ असं मोदी यांनी सांगितलं.
देशातील जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘करोनाचं संकट परतवून लावण्यासाठी एकच पर्याय आहे. घरात राहणं. तुमची एक चूक तुमच्या घरापर्यंत करोनाला घेऊन शकतो. ज्यावेळी करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर सुरूवातीच्या काळात प्रसाराचा वेग खूप कमी होता. पण, त्यानंतर हे प्रचंड वाढलं. मी देशवासियांना आवाहन करतो. त्यांनी घरातच राहून या संकटाला परतवून लावण्यासाठी मदत करावी. एक लक्षात ठेवा जान है तो जहाॅन है,’ असं म्हणत मोदी यांनी देशवासियांना धीर दिला.

Related posts

पुणे शहरात विक्रमी ६२२५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Vishal Khandagale

सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार !

Vishal Khandagale

कृतज्ञता व्यक्त करणारे व प्रेरणा देणारे पत्र : मंत्री मा.राजेश टोपे

Vishal Khandagale

Leave a Comment