Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, अन्यथा…

Pune City News :- कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत अनेक हॉटेल्सने युद्धात लढणाऱ्या डॉक्टरांची राहण्याची सोय करतात. अनेक जण या कार्यात मदत करत आहेत. काही ना काहीतरी खारीचा वाटा उचलतायेत, त्या सर्वांचे आभार मानतो. मी माझ्या आवाहनात हात जोडतो, विनंती करतो हे शब्द वापतो.पण कोविड-19 सारखा आणखी एक व्हायरस समोर येत आहे. जनतेला वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, नोटांना थुकी लावून व्हिडीओ पसरवले जात आहेत.

जर कोणी जाणूनबुजून अफवांचे व्हायरस पसरवत असाल तर खबरदार, तुम्हाला सोडणार नाही. जनतेला मी कोविड पासून वाचवेन, पण तुम्हाला कायद्यापासून कोण वाचवणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

मुख्यमंतत्र्यांच्या पत्रकार परिषदेततील ठळक मुद्दे :

▪️ देश कोणताही असो, जातपात धर्म कोणताही असो शत्रू एकच आहे. नाईलाजास्तव घरात राहावंच लागणार आहे. पंतप्रधानांशी चर्चा होत असते.

▪️ सोनिया गांधी, शरद पवारांशी चर्चा झाली, अनेक धर्मगुरु, मौलवी यांच्याशी चर्चा सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या परिने आवाहन करत आहे.

▪️ 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपणार आहे. पण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याला काळजी घ्यायला हवी.

▪️ तसेच कोरोनाची चाचणी केंद्र वाढवण्यात आली आहे. 51 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेलेत. दुर्दैवाने काही मृत्यू झालेत यात वृद्ध, आजारी व्यक्ती यांचा समावेश आहे.

▪️ आपल्या घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्या. त्यांच्यापासून अंतर राखणे, घराबाहेर जाऊ नये, हात स्वच्छ करुन त्यांची सेवा करा.

▪️ सर्व देशात हीच काळजी घेतली जात आहे. दिल्लीत जे घडले ते महाराष्ट्रात होऊ दिलं नाही. राज्यात परवानगी मागण्यात आली पण कोरोनामुळे ही परवानगी नाकारली.

▪️ जे दिल्लीतून राज्यात आले त्यांची यादी मिळाली, यातील 100 टक्के लोकांचा शोध घेतला आहे. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं आहे.

▪️ येत्या काही दिवसात पुढील सूचना मिळेपर्यंत महाराष्ट्रात कोणताही राजकीय, क्रीडा आणि धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नाही.

▪️ त्याचसोबत राज्यात 5 लाखाच्या आसपास परराज्यातील मजूर वास्तव्यात आहे. त्यांना दोन वेळचं जेवण, डॉक्टर्स वैगेरे सुविधा दिल्या आहेत.

▪️ कोणालाही कुठे जायची गरज नाही. आमच्या राज्यातील लोकांचीही इतर राज्यात काळजी घ्यावी. इतर राज्यात कोणीही माणूस अडकला आहे तर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा.

Related posts

महाराष्ट्रातील वृत्तपत्रे १ एप्रिल पासून प्रसिध्द !

Vishal Khandagale

कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचा पर्याय

Vishal Khandagale

पुणेकरांनी भरला तब्बल १३ कोटी दंड

Vishal Khandagale

Leave a Comment