Pune City News
महाराष्ट्र

राज्यातील 50 टक्के कैद्यांना कारागृहातून सोडणार !

Pune City News:- कोरोनानं तुरूंगातही शिरकाव केला असून काही कारागृहांमध्ये कैद्यांना कोरोनाची लागणं झाल्यानं राज्य सरकारची चिंता वाढली होती.त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारनं राज्यातील 50 टक्के कैद्यांची कारागृहातून सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील ऑर्थर रोड जेल, भायखळातील महिला कारागृह, पुण्यातील येरवडा कारागृहात काही कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं.त्यानंतर राज्य सरकारनं कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेबाबत हा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला होता.लॉकडाउनच्या काळात कारागृहांचे दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.विशेष म्हणजे या कारागृहातील कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आतमध्येच निर्देश दिले आहेत.

Related posts

आद्य संपादक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती !

Vishal Khandagale

इंदू मिलवरुन राजकारण नकोय…!

Vishal Khandagale

लॉकडाऊनची शक्यता! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार

Vishal Khandagale

Leave a Comment