Pune City News :- देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्ववभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
● लॉकडाऊन 4.0 पंतप्रधान मोदींकडून घोषणा
● लॉकडाऊन 4.0 चे नियम 18 मे पूर्वी कळवण्यात येतील
● स्थानिकांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे
● कोरोनाच्या संकटात स्थानिकांची भूमिका मोठी
● कोरोनामुळे तळागळातील लोकांना खूप काही सहन करावे लागले. त्यांना साहाय्य करायचे आहे
● मेक इन इंडियाच्या संकल्पास सक्षम करा
● उद्या अर्थमंत्री आत्मनिर्भर भारत याविषयी सविस्तर माहिती देतील
● जीडीपीच्या 10 टक्के रक्कम कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी
● सर्वप्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी आर्थिक पॅकेज
● आर्थिक पॅकेज, उद्योगधंदे, मजूर, शेतकरी, लघु उद्योग,तसेच दिवसरात्र झटणाऱ्यासाठी आहे
● आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा
● जगातील सर्वोत्तम टॅलेंट भारताकडे
● जीवन आणि मृत्यूच्या लढाईत जगाला भारताकडून मोठ्या आशा आहे
● कोरोनापासून वाचायचं आहे व पुढे जायचं आहे
● दररोज 2 लाख PPE किट, व 2 लाख मास्कची निर्मिती
● आत्मनिर्भर भारत हेच आपलं उद्दिष्ट
● जगात 42 लाखाहून अधिक लोकांना कोरोना झाला
● केवळ एका व्हायरसने जगाला उद्ध्वस्त केले आहे

