महाराष्ट्र

राज्यात चोवीस तासांत 80 पोलिसांना कोरोना…

Pune City News:- राज्यात मागील चोवीस तासात ८० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. काही शहरं रेड झोनमध्ये असून, कोरोना प्रसारामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५२ हजार ६६७ इतकी झाली असून आतापर्यंत १ हजार ८८९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर एकूण २० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून सध्या १ हजार ३१ कोरोनाबाधित पोलीस विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर ८३८ पोलीस कोरोनावर मात करून पुन्हा घरी परतले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.

Related posts

राज्य सरकाचा नवा आदेश, 1 एप्रिलपासून सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेत

Vishal Khandagale

…तरच मी कंगनाची माफी मागेल- संजय राऊत

Vishal Khandagale

पुणे विभागातून श्रमिक रेल्वेगाड्या रवाना !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX