Pune City News
महाराष्ट्र

11 एप्रिलला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

▪️ 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती.

▪️ राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

▪️ राज्यातील परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

▪️ परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, तसेच परीक्षा फॉर्म भरतांनाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाची अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

▪️ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत बैठक पार पडली.

▪️ दरम्यान, 11 एप्रिलला होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय बैठकीनंतर घेण्यात आला आहे.

Related posts

मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत : मंत्री जितेंद्र आव्हाड

Vishal Khandagale

ब्रेकिंग! केंद्र सरकारने ‘रेमेडेसिव्हीर’ची निर्यात थांबवली

Vishal Khandagale

मुंबईच्या फोर्टमध्ये इमारतीचा भाग कोसळला

Vishal Khandagale

Leave a Comment