Pune City News:- आज दुबईहून पुणे येथे पहाटे चार वाजून चार मिनिटांनी पोहोचलेल्या विमानातील सर्व म्हणजेच 115 भारतीय प्रवाश्यांची करोना संदर्भात वैद्यकीय तपासणी करण्यात करण्यात आली.सदर तपासणीमध्ये करोना संदर्भात कोणीही संशयित रुग्ण आढळून आलेले नाहीत.तथापी एका नागरिकाने स्वतःहून आजारी असल्याचे लेखी पत्रकात नमूद केल्याने, व त्याची तपासणीमध्ये खात्री झाल्याने ,त्याला नायडू हॉस्पिटल, पुणे येथे पाठवण्यात आलेले आहे. उर्वरित 114 प्रवाश्यांना सारसबाग, सणस कॉम्प्लेक्स, स्वारगेट, पुणे या ठिकाणी क्वारंटाईन साठी 05 बसेसमधून पाठवून देण्यात आलेले आहेत.
previous post
next post

