Pune City News:- काँग्रेसला मध्य प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. याचा अखेर आज शेवट झाला.कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे. मात्र,काल पासून मुख्यमंत्री कमलनाथ बहुमत सिद्ध करण्यास यशस्वी होणार की, सरकार कोसळणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण होती.
मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ज्योतिरादित्य यांच्या समर्थक आमदारांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आले होते, फ्लोअर टेस्टची मागणी करत माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याआधीच कमलनाथ यांनी राजीनामा देत असल्याची माहिती दिली आहे.
previous post

