Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

कोरोना : हॉस्पिटलमध्ये खाटा राखून ठेवा; केंद्र सरकारचे आदेश

Pune City News:- कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी काही खाटा राखून ठेवून विलगीकरण कक्षांची सुविधा करण्यात यावी, अशा सूचना केंद्र सरकारने देशातील सर्व रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांना दिल्या आहेत.
कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे केंद्र सरकारने एक सल्लापत्र(अ‍ॅडव्हायजरी) जारी करून या सूचना केल्या आहेत.पुरेशा संख्येने व्हेंटिलेटर्स, हायफ्लो आॅक्सिजन मास आणि अतिरिक्त मनुष्यबळ याची व्यवस्था करण्याचा यात समावेश आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असली तरी अजूनही नियंत्रणातच आहे. तथापि, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीच तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी रुग्णालये सुसज्ज असायला हवीत, या दृष्टीने सरकारने या सूचना जारी केल्या आहेत.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावं -चंद्रकांतदादा पाटील

Vishal Khandagale

काँग्रेस गटनेतेपदी नगरसेवक बागुल यांची निवड

Vishal Khandagale

जम्बो कोविड सेंटरची मुदत संपली – महापौर

Vishal Khandagale

Leave a Comment