Pune City News:- पुणे जिल्यातील वेल्हे तालुक्या मध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण मिळाल्या मुळे पुणे जिल्हा परिषदे चे मुख्याधिकारी यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संपूर्ण तालुक्यातील 26 गाव विलींगीकरण करण्यात आले आहे.
सदर कोरोनाग्रस्त 41 वार्षीय व्यक्ती ही पानशेत परिसरात राहण्यास असून तिच्या घरातील 5 व्यक्ती देखील कोरोनाबाधीत झाले आहेत असा अंदाज प्रशासनाणे व्यक्त केला आहे.तिच्या कार्यक्षेत्रातील वेल्हा तालुक्यातील पानशेत परिसरातील साईव, गोरडवाडी, वडाळवाडी, आदी गावांना क्वारंटाईन करण्यात आले आले, या परिसरातील गावामध्ये चेक पोस्ट तयार केले आहे.
या व्यक्ती च्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन आरोग्य विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.त्या सर्व व्यक्ती वेल्हा तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील आहेत त्यामुळं पुणे जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन संपुर्ण तालुका विलींगीकरण केला आहे.
या गावामध्ये येण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली असल्याची माहिती प्रातंधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.
previous post
next post

