Pune City News
गुन्हे विषयकमहाराष्ट्र

पोलिसांच्या मारहाणीत रुग्णवाहिका चालकाच्या वडिलांचा मृत्यू !

Pune City News :- बोरिवली येथून श्रीगोंदा येथे रुग्णाला घरी सोडविण्यासाठी घेऊन जात असताना टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका अडवली. एका पोलिसाने चालकाच्या वडिलांना काठीने मारहाण केली. यामध्ये मारहाण झालेल्या व्यक्तीचा काही अंतर पुढे गेल्यानंतर मृत्यू झाला. ही घटना आज, शुक्रवारी (दि. 27) दुपारी एकच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर घडली.

नरेश शिंदे (वय 49, रा. ठाणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. निलेश शिंदे यांची रुग्णवाहिका ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. ते गुरुवारी रात्री एका रुग्णाला घेऊन बोरिवली येथून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे निघाले होते.दुपारी एकच्या सुमारास त्यांची रुग्णवाहिका मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर आली. तिथे थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी निलेश यांना खाली उतरण्यास सांगितले.त्यानंतर एका वाहतूक पोलिसाने नरेश यांच्या पाठीत जोरात काठी मारली. तर दुस-या वाहतूक पोलिसाने नरेश यांना तुम्ही प्रवासी घेऊन जात असल्याचे म्हणत एका अधिका-याकडे नेऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
तसेच तडजोड म्हणून पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र नरेश यांच्याकडे पाच हजार रुपये नसल्याने रुग्णवाहिकेत रुग्ण आणि त्याचे नातेवाईक असल्याने त्यांनी तीन हजार रुपये देऊन प्रकरण मिटवले.
त्यानंतर निलेश रुग्णवाहिका घेऊन चाकणच्या दिशेने गेले. चाकणच्या पुढे गेल्यानंतर नरेश यांनी जीभ बाहेर काढून मान टाकली. वडिलांना त्रास होत असल्याने निलेश यांनी काही रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयांनी दाखल करून घेतले नाही. शेवटी शिक्रापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात येणार आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

Related posts

येरवड्यात किरकोळ वादातून खून

Vishal Khandagale

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पुणे पोलीस दलामधील 8 पोलीस निलंबित

Vishal Khandagale

Leave a Comment