Pune City News
कोरोनामनोरंजन

3 महिने बँक – कर्जाच्या हफ्त्यांना स्थगिती आणि ग्राहकांना दिलासा म्हणजे काय ?

Pune City News:-

● सिबिल स्कोअरवर काय फरक पडेल ?●
या तीन महिन्यांत एकही हप्ता न गेल्याने याचा परिणाम सिबिल स्कोअरवर होणार नाही. तसे आदेश आरबीआयने दिले आहेत. तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा हफ्ता सुरु होणार आहे.

●बुडालेला हफ्ता कधी द्यावा लागणार?●
तीन महिने हप्ता द्यावा लागणार नाही, याचा अर्थ असा नाही की ते पैसे माफ झाले. तर बँका तुमच्या लोनचे रिस्ट्रक्चरिंग करणार आहेत. म्हणजेच जर तुमचे पाच वर्षांचे लोन असेल तर तुमच्या लोनचा कालावधी तीन महिन्यांनी वाढणार आहे. म्हणजेच पाच वर्षे तीन महिने असा कालावधी होणार आहे. तसेच जर तुम्हाला हफ्तामध्ये वाढ करून बुडालेला हफ्ता फेडायचा असेल तर तोही पर्याय बँका देऊ शकतात.

● क्रेडिट कार्डधारकांसाठी काय?●
क्रेडिट कार्ड हे मुदत कर्ज नाही. ते ग्राहकांच्या खरेदीचे बिल आहे. आरबीआयच्या घोषणेत त्याचा समावेश नाहीय. जर एखाद्याने मोठी खरेदी केलेली असेल आणि ते बिल त्याने ईएमआयमध्ये रुपांतरीत केली असेल तर कदाचित नवी घोषणा लागू होऊ शकते. पण त्यासाठी आरबीआयला वेगळे स्पष्टीकरण द्यावे लागेल.
● ईएमआय स्थगितीचा तोटाही…●
तीन महिन्यांचा दिलासा मिळालेला आहे. *ईएमआय माफ करण्यात आलेला नाही.* यामुळे कर्जाचा अवधी वाढणार आहे. या थकलेल्या ईएमआयचे तीन महिन्यांचे अतिरिक्त व्याज द्यावे लागणार आहे. एकीकडे दिलासा असताना त्याचा भारही खिशातून उचलावा लागणार आहे.

Related posts

शिरूर तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख

Vishal Khandagale

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

Vishal Khandagale

आंतरजिल्हा प्रवासासाठी आले लाखात अर्ज ; ६५ हजारांहून अधिक अर्ज बाद

Vishal Khandagale

Leave a Comment