Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

टाळ्या, दिव्यांनी कोरोना पळणार नाही; राहुल गांधी

Pune City News :- देशात कोरोना विषाणू विरोधात सुरू असलेले प्रयत्न तोकडे आहेत,असं म्हणत काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. टाळ्या वाजवून,दिवे आणि टॉर्च पेटवून कोरोना पळणार नाही, असं राहुल गांधी यांनी ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात 22 मार्चला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. यात आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या सर्व कर्मचारी आणि संस्थांचे आभार मानण्यासाठी मोदींनी हे आवाहन केलं होतं.यानंतर उद्या रात्री म्हणजे 5 एप्रिलला 9 वाजात 9 मिनिटं घरातील लाइट बंद करून नागरिकांनी मेणबत्ती, मोबाइलचा प्लॅश लाइट, टॉर्च किंवा दिवे पेटवण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

Related posts

पिंपरी-चिंचवड मध्ये 41 संशयित निरीक्षणाखाली

Vishal Khandagale

कुटुंब नियोजनाची सक्ती करता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय

Vishal Khandagale

अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी PMPML च्या ४१ बसेस धावणार

Vishal Khandagale

Leave a Comment