Pune City News :- कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
▪️ कोणत्याही प्रकारच्या उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मीच तुम्हाला माहिती देतो आहे. आजपर्यंत जसे धैर्य दाखवले आहे तसेच यापुढेदेखील दाखवा.
▪️ महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे हे तर खरे आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत.
▪️ कारण मुंबई हे जगाचे प्रवेशद्वार असून आपण तपासण्या सुरु केल्या तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांना बंदी होती.
मात्र जे देश यादीत नव्हते त्यातले रुग्ण मिसळले. मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत.दरम्यान, दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे ती संख्या वाढत असून ज्यांचे वय जास्त आहे त्यांचा धोका वाढत असल्याचे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधताना त्यांनी सांगितले आहे.

