Pune City News:- पुणे शहर डिजीटल पास कक्ष येथे पुणे शहरात राहणा-या नागरीकांच्या अत्यावश्यक सेवा करीता डिजीटल पास देणेकरीता डिजीटल कक्ष स्थापन केलेला आहे. सध्या सर्व पुणे शहर (लॉकडाऊन) टाळेबंदी काळात अंत्यविधीला परवानगी मिळेल का हा प्रश्न मनात बाळगुन त्यांना त्यांचे आजीचे अत्यविधीकरीता संगमनेरला जाण्याची परवानगी मिळणेबाबत फॉर्म भरला होता. सदर नागरीक यांचेशी संपर्क केला असता त्यांनी त्यांचे आजीचे अंतिम दर्शन घ्यायचे असून मला संगमनेरला जाण्याची परवानगी द्या अशी विनंती केली. त्यानंतर आम्ही त्यांचेकडून आवश्यक ती माहिती घेवून खात्री करून त्यांना सदर पास देण्यात आला त्यानंतर सदर नागरीक यांनी तुम्ही मला पास दिल्याने मला वेळेवर मयतकरीता जाता आले व आजीचे अंतिम दर्शन घेता आले. मी तुमचा खुप आभारी असे मॅसेजव्दारे कळविले.
एक नागरीक यांनी सपंर्क करून कळविले की, मला किडनी स्टोन असून मला खुप त्रास होत आहे. माझी काळजी घेणेसाठी येथे कोणी नाही . माझे आई वडील मुंबईला असतात मला त्यांचेकडे जायचे
आहे. आम्ही त्यांना कसे जाणार याबाबत विचारणा केली असता माझे बरोबर कोणी नाही मी टुव्हिलरवर जाणार असून मला परवानगी द्या अशी विनंती केली . परंतु आम्ही त्यांचेकडून त्यांचे आईचा नंबर घेतला
आणि त्यांना सदर बाबत माहिती दिली असता त्यांनी आम्ही कॅब बुक करतो . त्याला त्या कॅबनी येण्याची परवानगी दया अशी विनंती केल्याप्रमाणे मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा ,पुणे शहर यांचे स्वाक्षरीचा पास उपलब्ध करुन दिला. या बाबत शिल्पा चव्हाण
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,सेवा कार्यप्रणाली विभाग गुन्हेशाखा,पुणे शहर पत्रक काढून माहीती दिली.

