Pune City News
राष्ट्रीय

रेल्वेने परराज्यातील मजूर, कामगारां साठी चालू केली “श्रमिक रेल्वे”

Pune City News:- टाळेबंदी (लॉकडाऊन) च्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने व रेल्वे मंत्रालया कडून ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचू शकणार आहेत.’परराज्यातील मजूर आणि कामगार हे सर्व गरीब असून कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे.

मानवतेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने या मजुरांकडून तिकीट आकारु नये, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे.कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत.

Related posts

पाकिस्तानात लॉकडाऊन शक्य नाही : पंतप्रधान इम्रान खान

Vishal Khandagale

मुख्यमंत्री आज पंतप्रधानांना भेटणार; विविध मुद्द्यांवर होणार चर्चा

Vishal Khandagale

इराण च्या उपपंतप्रधान, आरोग्य मंत्र्यांसह 25 खासदारांना कोरोना

Vishal Khandagale

Leave a Comment