Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

गॅस सिलेंडर महागले

तीन महिन्यापासून सतत गॅसच्या किंमतीमध्ये घट होत होती. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने भारतातही किंमती वाढवल्या आहेत. एक जूनपासून विनाअनुदानित गॅसच्या दरात वाढ आमंलात आणली आहे.

वाढ : 14 किलोच्या विनाअनुदानित गॅसच्या किंमतीत राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये 11 रुपये 50 पैशांनी वाढ केली आहे. तर कोलकात्यामध्ये 31 रूपये 50 पैसे आणि चेन्नईमध्ये 37 रुपयांची वाढ केली आहे.

परिणाम : राजधानी दिल्लीमध्ये 14 किलोंच्या विनाअनुदानित गॅसची किंमत 593 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये 616 रुपये तर चेन्नईमध्ये 606.50 रुपये झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत 14 किलोच्या विनाअनुदानिक गॅसची किंमत 579 वरुन आता 590.50 रुपये झाली आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर एलपीजी सिलिंडरच्या किंमत वाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. पीएमयूवायच्या लाभार्थ्यांना 30 जूनपर्यंत एक विनामूल्य सिलेंडर मिळणार आहे.

Related posts

महाराष्ट्रात “227 सायबर गुन्हे” दाखल !

Vishal Khandagale

आयआयटी मुंबई देशात अव्वल मात्र जगात…

Vishal Khandagale

पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलेला नाही…

Vishal Khandagale

Leave a Comment