Pune City News
महाराष्ट्र

ठाकरे सरकारने चेष्टा लावली…

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यास सरकारने केलेल्या मदतीबाबत सरकारने चेष्टा लावली असल्याची टीका भाजपचे खा.नारायण राणे यांनी केली आहे.

खा.नारायण राणे म्हणाले :

▪️ निसर्ग चक्रीवादळ आले तेव्हा मी कोकणातच होतो. किती नुकसान झाले याची मला कल्पना आहे. नेते पाहणीसाठी जात असून त्याप्रमाणे मदत जाहीर केली जात आहे.

▪️ जे नुकसान झाले त्यासाठी दिलेली मदत अल्पशी असून त्याने घर किंवा दुरुस्ती काहीच होणार नाही. सरकारने मदत तसेच इतर बाबतीत फेरविचार करावा.

▪️ सिंधुदुर्गाला २५ कोटींची मदत दिली, परंतु यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांतील २०० कोटी परत घेतले. ठाकरे सरकारने चेष्टा लावली असून कोणीही याबद्दल बोलत नाही.

▪️ पैसे परत घेतात आणि जिल्हाधिकारी आपल्या मर्जीने पैसे देत असून कोणीही विरोध करत नाही. त्यामुळे कोकणाकडे पाहताना मच्छीमारांच्या नुकसानीकडे पहावे.

दरम्यान, नैसर्गिक आपत्ती असल्याने तिजोरी कशीही असली तरी मदत केली पाहिजे तसेच फक्त फेरफटका मारुन काही होत नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

‘या’ विभागाच्या ‘सीईटी’ परीक्षा पुढे ढकलल्या

Vishal Khandagale

राज्यात दहावीच्या निकालात यंदा तब्बल १८.२० टक्के वाढ

Vishal Khandagale

परमबिर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Vishal Khandagale

Leave a Comment