शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले :
▪️ शिवसेनेचा जन्म अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच झाला असून शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे.
▪️ विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही, संस्कृती असून आपल्यासोबत राजकारण करण्याचा प्रयत्न झाला.
▪️ विरोधकांचे राजकारण मोडीत काढण्यासाठीच मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे.
▪️ राज्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात शिवसैनिक धावून जात असून चक्रीवादळ असो किंवा कोरोनाचे संकट.
▪️ शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा असून शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने बनल्या आहेत.
दरम्यान, शिवसेनेने विचारधारा बदलेली नसून शिवसेना कुणापुढे लाचार होणार नसल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

